जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ मे २०२१ । एरंडोल तालुक्यातील कढोली येथे १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन विश्वनाथ भोई (वय-३१) असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध एरंडोल पोलिस स्टेशन ला मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी सकाळी १०:३०वाजेच्या सूमारास ही घटना घडली.
पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे, संदीप सातपुते, अकील मुजावर, राजेश पाटील, पंकज पाटील, किरण पाटील हे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.