---Advertisement---
यावल शैक्षणिक

वाघझिरा येथील मोहीणी भुगवाड्या एमबीबीएसच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

mohini bhugavadya
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ मे २०२१ । यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेल्या अतिदुर्गम क्षेत्र म्हणुन ओळखले जाणारे वाघझीरा येथील आदीवासी कुटुंबातील मोहिणी मालसिंग भुगवाड्या(पावरा) या शासकीय वैद्यकिय महाविद्यालय नागपूर येथुन सन २०१६-२०२१ च्या वर्गा मधून प्रथम श्रेणीत एम.बी.बी.एस.ची परीक्षा उतीर्ण झाली आहे.

mohini bhugavadya

कु.मोहिणी यांचे वडील मालसिंग जंगलू भुगवाड्या हे जिल्हापरीषदेच्या नायगाव येथील शाळेत शिक्षक म्हणुन कार्यरत असुन, आई सौ.नवादी मालसिंग भुगवाड्या या  किनगाव आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या मालोद येथील आरोग्य उपकेंन्द्रात परीचारीका म्हणून सेवा बजावत आहेत कु.मोहिणी भुगवाडया यांच्या या यशाबद्दल त्यांचे शाळेतील मुख्याध्यापिका सौ जयश्री चोपडे, शिक्षक कराळे सर, मनिषा नावकार मॅडम व समाजबांधव सर्वत्र कौतुक होत आहे.

---Advertisement---

दरम्यान कु .मोहीणीचे १०पर्यंतचे प्राथमीक शिक्षण शेगाव जिल्हा बुलढाणा येथील श्री स्वामी विवेकांनद इंग्लीश ज्ञानपीठ स्कुल मध्ये झाले आहे व नंतर १२चे शिक्षण श्रीमती मेहेरबानु कॉलेज ऑफ सायन्स अँन्ड कॉर्मस, अकोला येथे झाले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---