जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२२ । रविवार पार पडलेल्या राज्यातल्या 34 जिल्ह्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यात जळगाव जिल्ह्यातील मोहाडी ग्रामपंचायतच्या निकालाकडे जिल्हासह राज्याचं लक्ष लागून होतं. त्याचा निकाल आता समोर आला आहे. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायत सदस्यपदी विजयी झाल्या आहेत. मात्र, त्यांचं ग्रामविकास पॅनल पराभूत झाल्या आहेत.
भाविनी पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलला 10 पैकी फक्त 3 जागा मिळाल्या आहेत. तर भाविनी पाटील यांचे प्रतिस्पर्धी शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलला दहा पैकी तब्बल सात जागा मिळाल्या आहेत. तसेच त्यात लोकनियुक्त सरपंचपदही शरद पाटलांच्या पॅनलला मिळालं आहे.
मोहाडी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होती. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील यांनी मोहाडी ग्रामपंचायतीतून आपलं नशीब आजमावत होत्या. भाविनी पाटील यांनी त्यांचं सासर असलेल्या मोहाडी गावात आपले ग्रामविकास पॅनल उभे केले होते. भाविनी पाटील यांच्या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता. मात्र, तरी निकालात त्यांच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला आहे.
विशेष म्हणजे ज्या पॅनलने पाटील यांच्या पॅनलचा पराभव केला त्या पॅनलचं नेतृत्वही भाजपचाच एक कार्यकर्ता करत होता.सी.आर.पाटील यांच्या मोठ्या मुलगी सध्याच्या निवडणुकीत विजयी झाल्या असत्या तर त्या पुन्हा मोहाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच झाल्या असत्या. सुरतमध्ये जन्मलेल्या भाविनीने शालोम इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले आहे. त्यांचे लग्न राम पाटील यांच्याशी झाले आहे. ते प्रदीर्घ काळापासून राजकारणात सक्रिय आहेत. यावेळी सर्वांच्या नजरा या निवडणुकीकडे लागल्या होत्या.