---Advertisement---
वाणिज्य

सर्वसामान्यांना दिलासा! आता मोदी सरकार स्वस्तात पीठ विकणार? पहा प्रति किलोचा दर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२३ । केंद्रातील मोदी सरकारकडून देशातील जवळपास 81.35 कोटी लोकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत मोफत रेशन पुरविले जात असून गेल्या वर्षी सरकारने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मोफत रेशन देण्याचे सांगितले होते. मात्र आता त्याची शेवटची तारीख जवळ येण्यापूर्वीच बाजारात स्वस्तात पीठ उपलब्ध होणार असल्याचे बोलले जात आहे. गहू आणि पिठाच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर सरकार स्वस्तात पीठ विकण्याच्या योजनेवर काम करत आहे. एका अहवालानुसार, सरकार भारत ब्रँड अंतर्गत 27.5 रुपये प्रति किलो दराने पीठ विकणार आहे.

pith Bread jpg webp

7 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची अपेक्षा
7 नोव्हेंबरपासून पिठाची विक्री सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात ब्रँडेड पिठाचा भाव 35 ते 40 रुपये किलो आहे. त्याच वेळी, मध्य प्रदेशात गव्हाच्या पिठाचा दर सुमारे 45 रुपये प्रति किलो आहे. साधारण ब्रँडेड पिठाचे 10 किलोचे पॅकेट सुमारे 370 रुपयांना मिळते. अशाप्रकारे भारत ब्रँडचे पीठ २७५ रुपयांना मिळणार आहे. यासाठी राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघाला नोडल एजन्सी बनवण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. FCI केंद्रीय पूलमधून भारत ब्रँडच्या पिठासाठी सुमारे 2.5 लाख टन गव्हाचे वाटप करत आहे.

---Advertisement---

10 आणि 30 किलो पॅकेट
गव्हाचे पीठ 10 किलो आणि 30 किलोच्या पॅकमध्ये बाजारात उपलब्ध केले जाईल. या पिठाचे 10 किलोचे पॅकेट सुमारे 275 रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. याबाबतचा निर्णय शासनाच्या वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून डाळींच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारकडून स्वस्तात हरभरा डाळही भारत ब्रँड नावाने विकली जात आहे. त्याचा दर ६० रुपये किलो आहे. 30 किलोच्या मोठ्या पॅकेटची किंमत 55 रुपये किलो आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---