---Advertisement---
वाणिज्य

खुशखबर : मोदी सरकार देणार मोफत गॅस कनेक्शन देणार, ‘हे’ असणार नियम?

gas
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२१ । जर तुम्ही मोफत घरगुती गॅस सिलिंडेरचे कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार लवकरच उज्ज्वला योजनेचा  दुसरा टप्पा लागू करणार आहे. जर तुम्हाला देखील या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर आता तुम्ही घर बसल्या अर्ज करू शकता. या योजनेअंतर्गत आता ते लोक एलपीजी कनेक्शन घेऊ शकतील, ज्यांचा कायमचा पत्ता नाही.

gas

सरकारी तेल कंपन्या आता उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा अंतिम मसुदा तयार करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. धुरामुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन सरकारने महिलांसाठी मोफत गॅस सिलिंडर कनेक्शन देण्याची योजना आखली होती. या योजनेंतर्गत तुम्ही घरी बसून मोफत एलपीजी सिलिंडर कनेक्शनसाठी अर्ज करू शकता. अर्जदार महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. तसेच त्यांचे बँक खाते आणि बीपीएल कार्ड असणे आवश्यक आहे.

---Advertisement---

या योजनेचा लाभ शहरातील गरिब लोकांना मिळणार आहे. त्याचसोबत या योजनेचा लाभ देशातील विविध भागात नोकरीच्या कारणामुळे पत्ता बदलावा लागतो. तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या योजनेअंतर्गत आधीच 1 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे जाहीर केले होते.

ऑनलाईन अर्ज कसा करावा

-तुम्हाला आधी अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

– pmujjwalayojana.com वर क्लिक करा.

-होमपेजवर डाऊनलोड फॉर्मवर जा आणि त्यावर क्लिक करा.

-डाऊनलोड फॉर्मवर क्लिक केल्यानंतर पीएम उज्ज्वला योजनेचा फॉर्म येईल.

-आता फॉर्ममध्ये तुमचे नाव, ई-मेल आयडी, फोन नंबर आणि कॅप्चा भरा.

-आता OTP जनरेट करण्यासाठी बटणावर क्लिक करा.

-त्यानंतर फॉर्म डाऊनलोड करा.

-फॉर्म जवळच्या एलपीजी गॅस एजन्सीला सबमिट करा

आता तुम्हाला हा फॉर्म तुमच्या जवळच्या एलपीजी एजन्सीकडे जमा करावा लागेल. यासह आपल्याला आधार कार्ड, स्थानिक पत्त्याचा पुरावा, बीपीएल रेशन कार्ड आणि फोटो इत्यादी कागदपत्रे द्यावी लागतील. कागदपत्र पडताळल्यानंतर तुम्हाला एलपीजी गॅस कनेक्शन मिळेल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---