जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२४ । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ४५ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर झालीय. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना माहीम-दादर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. तर मनसेने जळगाव शहरातून डॉ. अनुज पाटील यांना उमेदवारी जाहीर केलीय.
यापूर्वी महायुतीने जळगाव शहरातून विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केलीय. तर महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार अनिश्चित असलयाने संभ्रम कायम आहे. यामुळे ‘मविआ’ जळगावातून कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यातच मनसेने ४५ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली.
यात जळगाव शहरातून डॉ. अनुज पाटील यांना उमेदवारी जाहीर केलीय. तसेच मनसेच्या यादीमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे मनसे नेते अविनाश देशपांडे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी त्यांचा सामना रंगू शकतो. दरम्यान मनसेने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता उर्वरित किती जागांवर मनसे उमेदवार देणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.