---Advertisement---
जळगाव शहर

यावल ग्रामीण रुग्णालयात ५० ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याबाबत आ.सुरेश भोळेंचे पत्र

suresh bhole
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने जास्त प्रमाणात वाढत असून पुढील दिवसात वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येला वैद्यकीय उपचार मिळण्यास खूपच दिरंगाई होत आहे. जिल्ह्यातील यावल तालुका येथे कोविड रुग्णांची संख्या वाढत असून तेथे ऑक्सिजन सुविधा पुरेश्या प्रमाणात नसल्याने तेथील नागरिकांना उपचार घेण्यास त्रास होत असून त्यांची उपचार घेण्यासाठी इतर शहरांमध्ये धावपळ होत आहे. 

suresh bhole

यावल येथील ग्रामिण रुग्णालयात ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देणे बाबत किंवा अन्य शासकीय जागेत ५० बेडचे ऑक्सिजन सुविधे सह कोविड सेंटर त्वरित सुरु करावे अशी मागणी यावल तालुक्यातील नागरिकांनी  भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे (राजु मामा)यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केलेली होती.

---Advertisement---

सदर निवेदनाचा पाठपुरावा करून आ.सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी जिल्हाधिकारी व जिल्हाशल्य चिकित्सक यांना सदर मागणीचे निवेदन देऊन लवकरात लवकर यावल येथे ५० बेडचे ऑक्सिजन सुविधा असलेले कोविड सेंटर सुरु करण्याबाबत विनंती केलेली आहे. असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---