---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

पुढच्या काही वर्षात गुलाबराव पाटील होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ; कोणी केला दावा पहा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुने २०२३ । महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी जळगावातून समोर आली आहे. ती म्हणजेच राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे पुढच्या काही वर्षात मुख्यमंत्री होऊ शकतात, असा दावा शिंदे शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार किशोर पाटील यांनी केला आहे.

gulabrao patil 1 jpg webp

“गेल्या 25 वर्षात आमदार, जिल्हाप्रमुख, उपनेते, नेते, राज्यमंत्री आणि कॅबिनेटमंत्री असा गुलाबराव पाटील यांचा प्रवास मी पाहतोय. उद्या कदाचित गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्री होतील की काय याचं मनावर दडपण आहे”, असं वक्तव्य आमदार किशोर पाटलांनी केलं.

---Advertisement---

“मला यापुढे शुभेच्छा देताना थोडं घाबरावं लागेल. कारण कॅबिनेट मंत्रीपदाचं पुढचं पद हे फक्त मुख्यमंत्रीपद आहे. जर ते मुख्यमंत्रीपद मी या ठिकाणी जाहीर केलं तर तिकडून सगळ्यांनी मिळून त्यांच्यासहीत माझे पाय कापायला सुरुवात होणार आहे”, असं किशोर आप्पा म्हणाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---