⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | महायुतीच्या विजयासह मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी आ.किशोर पाटीलांचे हनुमानाला साकडे

महायुतीच्या विजयासह मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी आ.किशोर पाटीलांचे हनुमानाला साकडे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२४ । नरेंद्र मोदी हे देशाच्या पंतप्रधान पदी तिसऱ्यांदा विराजमान व्हावेत व जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ या प्रचंड मताधिक्याने निवडून याव्या यासाठी पाचोरा शहरातील श्रीराम मंदिरात हनुमान चालीसा पठण व महा आरती करण्यात आली. आज श्री महावीर हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधत पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा शिवसेना महायुतीच्या वतीने सकाळी ११ वाजता सामूहिक हनुमान चालीसा पठण व महाआरती करण्यात आली.

यावेळी मंदिर परिसर सियावर रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय ,भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता. यावेळी उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर,बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,तालुका प्रमुख सुनील पाटील, भाजपचे कोष्याध्यक्ष कांतीलाल जैन, रमेश वाणी माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, युवा नेता सुमीत पाटील,युवा सेना जिल्हा प्रमुख जितेंद्र जैन, तालुका प्रमुख अनिल पाटील, भाजपाचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश वाणी,निवडणूक प्रबंधन समिती सदस्य सुनिल पाटील,शहराध्यक्ष दिपक माने, युवा मोर्चाचे समाधान मुळे, विधानसभा विस्तारक गोविंद शेलार,माजी शहराध्यक्ष रवी पाटील, माजी नगराध्यक्ष शरद पाटे, दत्ता जडे,नगरसेवक गंगाराम पाटील,राम केसवानी, बंडू चौधरी, सुधीर शेलार,शेतकरी संघाचे उपसभापती नरेंद्र पाटील,शहर प्रमुख सुमीत सावंत, भोला पाटील, हेमंत चव्हाण,किशोर भोई,सुरज शिंदे, छोटू चौधरी,एकनाथ पाटील,सनी शिरसाट यांचेसह महायुतीतील भाजपा, शिवसेना, मनसे आणि मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची तसेच राम व हनुमान भक्तांची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.