---Advertisement---
अमळनेर

कोरोनाची साखळी तोडा, डीजे जप्त करून वधू-वर पित्यावर गुन्हा दाखल करा

amlaner new
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२१ । आपले गाव हिटलिस्टवर यायला नको कोरोनाची साखळी तुटलीच पाहिजे याकरिता आजपासून डीजे जप्त करा, वधू- वर पिता यांच्यावरही कारवाई करा, पोलिसांचे चेक पॉईंट लावा, भाजीपाला लिलावातील गर्दी बंद करा, बेजबाबदार समाजकंटकांमुळे जबाबदार नागरिकांना त्रास भोगावा लागत आहे. त्यामुळे कठोर पावले उचलून कारवाई करा असे सक्त आदेश आमदार अनिल पाटील यांनी कोरोनाच्या आढावा बैठकीत प्रशासनाला दिल्यात.

amlaner new

पंचायत समितीच्या सभागृहात सर्व प्रशासकीय विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी बंद हाताळण्याबाबत सूचना दिल्यात. तसेच यावेळी कोरोन्टाईन रुग्णांवर लक्ष ठेवणे, चाचण्या वाढवणे, कोविड केयर सेंटर अपूर्ण पडल्यास दुसरे सेंटर सुरू करणे , खाजगी दवाखान्यातील परिस्थिती, बसस्थानकात गर्दी, याबाबत आढावा घेण्यात आला. संचारबंदी बाबत 4 अधिकारी नेमण्यात आले असून उद्घोषणा करण्यात येत आहे, बिना मास्क ची कारवाई वाढवण्यात येईल,  अवैध व जादा प्रवाशी वाहतुकदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी सांगितले.

---Advertisement---

विशेष म्हणजे रेमडेसीयर चे जास्त पैसे घेतले जात असतील तर त्या वैद्यकीय सेवा कर्त्यांवर देखील कारवाई करा नागरिकांनी देखील तहसीलदारांकडे तक्रारी कराव्यात असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले. यावेळी डॉ गिरीश गोसावी व डॉ प्रकाश ताळे यांनी लसीची संख्या वाढवून मागितली. केयर सेंटरला डॉक्टर व परिचारिका स्टाफ उपलब्ध करून देत असल्याची माहिती दिली.

या बैठकीस आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे चोपड्याचे प्रभारी प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, डॉ राजेंद्र शेलकर, डॉ आशिष पाटील, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, सहाययक निबंधक गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हेमंत महाजन, आगार प्रमुख अर्चना भदाणे, हरीश कोळी, पोलीस नाईक डॉ शरद पाटील, होमगार्ड समादेशक अरुण नेतकर हजर होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---