जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । अमळनेर येथील कुरेशी परिसरातील पाच वर्षीय बालिका तीन दिवसांपासून बेपत्ता झाली होती. बोरी नदीच्या पात्रात या बालिकेच्या मृतदेह गुरुवारी पाण्यात तरंगताना आढळून आला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात होत असून, याप्रकरणी बालिकेच्या पालकांनी परिसरातील एका युवकावर संशय व्यक्त केला आहे.
जोया शेख तैय्यब कुरेशी ही बालिका २३ नोव्हेंबरपासून बेपत्ता झाली होती. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही तिचा तपास न लागल्याने अमळनेर पोलिसांत हरवल्याची नोंद केली होती. २४ रोजी मुले मासे पकडण्यासाठी नदीपात्रात गेले असता, त्याना नदीच्या डोहात मृतदेह तरंगताना दिसला. नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणला. डॉ प्रकाश ताळे यांनी पालकांच्या मागणीनुसार इनकॅमेरा शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवला आहे. विविध तपासणी अहवाल मागवण्यात आले आहेत. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र दिवे, पोलिस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील आणि मिलिंद भामरे यांनी भेट दिली. याप्रकरणी तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.