⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | येत्या काही महिन्यात विरोधकांचे टांगा पलटी, घोडे फरार होणार ; मंत्री गुलाबराव पाटीलांचा निशाणा

येत्या काही महिन्यात विरोधकांचे टांगा पलटी, घोडे फरार होणार ; मंत्री गुलाबराव पाटीलांचा निशाणा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२४ । जळगावच्या सागर पार्क येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात संबोधित करताना जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विविध विकास कामाची माहिती देताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

महिलांसह सर्व घटकांसाठी आपण योजना राबवल्या. मात्र काही लोक आपल्याबद्दल अफवा पसरवत आहे; परंतु कुणीही या अफवांना बळी पडू नये. येत्या काही महिन्यात विरोधकांचे टांगा पलटी, घोडे फरार होणार, आज इथे बसलेल्या महिला भगिनींची गर्दीच सांगते की ही योजना छप्पर फाड योजना आहे, असे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने ३५ हजार कोटी मंजूर केले आहे. यासह जिल्ह्यात नारपार योजना, केळी महामंडळ, सिंचन योजना, बहिणाबाई स्मारकासह अनेक योजनांसाठी शासनाने निधी दिला असल्याचंही मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जळगाव जिल्ह्यात ५ लाख २० हजार महिलांनी अर्ज भरले असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.