⁠ 
[rank_math_breadcrumb]

सर्वसामन्य कार्यकर्त्यांची खंबीर साथ हीच माझी श्रीमंती; मंत्री गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सुषमा अंधारेंच्या टीकेचा घेतला समाचार

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२४ । उद्धव ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खरपून समाचार घेतला. संजय राऊत यांच्यावर देखील टोला लगावला.

सुषमा अंधारे बोलून गेल्या होत्या की या रेड्याला आम्ही कापणार आहोत तो रेडा आता तयार आहे.तुझ्याकडे कापण्याला कोणी माणूस तलवार घेऊन उभा आहे का याची तलाश हा गुलाबराव पाटील करतो आहे, असा उपरोधिक टोला त्यांनी यावेळी लगावला.

२०२२ साली आम्ही गद्दारी केली नाही. आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी एकनिष्ठ राहून उठाव केला होता. मी एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला नसता तर या दोन वर्षाची कोट्यवधी रुपयांची कामे झाली, ती झाली नसती हे तुम्हाला मान्य करावे लागेल. तुम्ही बोलले होते ना ज्या चाळीस ठिकाणी कुठून गेलेले लोक उभे आहेत. त्या 40 ठिकाणी आम्ही शिवसैनिक उभे करू तर किधर है तेरा शिवसैनिक.संजय राऊत, असा चिमटा त्यांनी काढला.

शरद पवार-उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची आपली लायकी नाही
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करु नका, त्यांच्यावर टीका करण्याची आपली लायकी नाही. त्यांच्यावर टीका करण्यासाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आहे. मी टीका करतो ती संजय राऊत यांच्यावर कारण तो आपल्या लेव्हलचा माणूस असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.

जनतेला केले मोठे आवाहन
यावेळी विरोधी उमेदवार कोण यापेक्षा धनुष्यबाण डोळ्यासमोर ठेवा. प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख आणि दु:खात मी आणि माझा परिवार आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. संपर्क कधीही कमी पडू दिला नाही. आता तुमची साथ हवी आहे. सर्वसामन्य कार्यकर्त्यांची खंबीर साथ हीच माझी श्रीमंती आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते हे थकणारे , विकणारे व झुकणारे नसून लढणारे असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. मी जर पडलो तर माझ्या घरासमोर नाही तुमच्या घरासमोर फटाके फुटतील, असा चिमटा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना घेतला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.