⁠ 
शुक्रवार, मार्च 1, 2024

… तर राजकारणातून संन्यास घेईल ; मंत्री गुलाबरावांचे विरोधकांना ओपन चॅलेंज

जळगाव लाईव्ह न्यूज । 8 फेब्रुवारी 2024 । जळगावातील बिलवाडी येथे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात जोरदार फटकेबाजी केली. विशेष त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील विकासकामावरून विरोधांना ओपन चॅलेंज केलं.

नेमकं काय म्हणाले?
‘आपल्या मतदारसंघात कोणत्याही गावात जा जर कोटीच्या खाली काम निघाले तर राजकारणातून संन्यास घेईल, विरोधकांपेक्षा कणभर काम जरी जास्त केलेला नसेल तर आमदारकीसाठी फॉर्म भरणार नाही’, या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना ओपन चॅलेंज दिलं.

‘ गरीबी मी जवळून पाहिली आहे, सोन्याचा चमचा घेवून मी जन्माला आलो नाही. मी सर्व साधारण माणूस आहे. याला जेल मध्ये टाका, याला त्रास द्या हा धंदा मी आयुष्यभर केला नाही..नुसत मत मागायच… काम करायचं नाही, बोंब पडायची नाही आणि नुसती टीका करायची’, अस म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी गुलाबराव देवकर यांच्यावर शरसंधान साधले.

राजकीय परिस्थितीवर मिश्किल वक्तव्य
तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मिश्किल वक्तव्य केलं.‘ ज्या नेत्यांच्या मागे कार्यकर्त्यांचा पाठिंबा असतो, तोच नेता मोठा असतो. आता पुढारी लोकांना वेडं करत नाहीत तर लोकं पुढाऱ्यांना वेडं करतात. पक्षांची दुकानंच एवढी झालीत. आम्हाला कार्यकर्ते सांभाळणंही एवढं मुश्किल झालंय. तू नाही दिलं जातो की भाजप मध्ये..भाजप मध्ये नाही दिलं, मी जातो शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये.. राष्ट्रवादीत नाही मिळालं तर मी तर जातो बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये.. असं सुरु आहे’ अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी आजच्या राजकीय परिस्थितीवर मिश्किल वक्तव्य केलं.