मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवावर मंत्री गिरीश महाजनांचे खळबळजनक विधान; काय म्हणाले वाचा

डिसेंबर 21, 2025 5:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२५ । मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना होम पिचवर मोठा धक्का बसला आहे. मुक्ताईनगरच्या नगरपंचायत निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मुलीचा विजय झाला आहे. दरम्यान भाजपच्या पराभवाचे खापर मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे कुटुंबावर फोडले आहे.

girish mahajan 1 jpg webp webp

मंत्री गिरीश महाजन यांनी थेट एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधत, “एकनाथ खडसे हा माणूस आमच्यासाठी अपशकुन ठरला आहे,” असे खळबळजनक विधान केले. ते पुढे म्हणाले की, “एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटात असताना भाजपच्या व्यासपीठावर येऊन प्रचार करतात, हे कार्यकर्त्यांना आणि मतदारांना पटले नाही. याचा थेट फटका आम्हाला बसला.

Advertisements

महाजन यांनी खडसे कुटुंबाच्या राजकीय ताकदीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एकनाथ खडसे यांचं आता काहीही राजकीय वजन उरलेलं नाही. दोन वेळा त्यांची मुलगी विधानसभेत उभी राहिली, पण दोन्ही वेळा मोठ्या फरकाने पराभूत झाली,” असा टोला त्यांनी लगावला. मुक्ताईनगरमध्ये भाजपची जागा गमवावी लागल्याची खंत व्यक्त करत, या पराभवामागे खडसे कुटुंबच जबाबदार असल्याचा आरोप, महाजन यांनी केला.

Advertisements

दरम्यान, या आरोपांमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि जुन्या वादांचे पडसाद आगामी काळात अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. मुक्ताईनगरचा निकाल हा केवळ नगरपंचायतीपुरता मर्यादित न राहता, जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा देणारा ठरत असल्याचे चित्र आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now