---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

मंत्री गिरीश महाजन श्रीनगरसाठी रवाना

girish mahajan
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२५ । जम्मू- काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांना समावेश आहे. दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आणि जम्मू-काश्मिरात अडकलेल्या इतर पर्यटकांच्या सुखरूप सुटकेसाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहे. यातच मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना झाले आहेत.

girish mahajan

मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल. हे विमान श्रीनगर येथून दुपारी १२.१५ वाजता निघाले आहे. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव घेऊन येणारे विमान हे सायंकाळी ६ वाजता निघेल. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन दुपारी १.१५ वाजता श्रीनगर येथून विमानातून आणले जाईल.

---Advertisement---

मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबई विमानतळ येथे समन्वयासाठी असतील, तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना झाले आहेत. इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment