⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय स्फोट होणार ; मंत्री महाजनांच्या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२४ । आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठं मोठ्या घडामोडी घडत आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं भाकीत वर्तविल्यानांतर काँग्रेसला मोठे धक्के बसल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता येत्या आठवड्यात पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात स्फोट होणार, असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केलाय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काय म्हणाले महाजन?
“मी मागच्या वेळस सांगितले स्फोट होणार आहे. त्यावेळेस काँग्रेसमध्ये स्फोट झाला. याबत त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. ते दिवाळी, दसरा सणात कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येत असतात. त्यामुळे ती कौटुंबिक भेट असेल. या सुप्रिया सुळे आणि अजित दादा भेटी संदर्भात अजित दादा सांगू शकतील. राज्यात आठ दिवसात पुन्हा स्फोट होण्याची शक्यता आहे”, असंही भाकीत गिरीश महाजन यांनी वर्तवलं.

विशेष म्हणजे त्यांनी याअगोदर देखील मंत्री महाजन यांनी असं भाकीत वर्तवलं होते. त्यांनी गेल्यावेळी असं भाकीत वर्तवल्यानंतर काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. तसेच काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश केलाय. या तीनही घटना महाराष्ट्रातील जनतेसाठी अनपेक्षित होत्या. त्यानंतर येत्या आठवड्यात पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात स्फोट होणार, असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केलाय.त्यामुळे आता कोणता पक्षाचा नेता फुटणार हे पाहणं गरजेचं आहे.