---Advertisement---
जळगाव जिल्हा

Jalgaon : जिल्हा परिषदेचे नवीन सीईओ मीनल करणवाल यांनी स्विकारला पदभार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२५ । जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांची छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

minal

गुरुवार, दि. 20 मार्च रोजी श्रीमती करणवाल यांनी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. डी. लोखंडे तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

---Advertisement---

पदभार स्वीकारल्यानंतर श्रीमती करणवाल यांनी तत्काळ सर्व विभाग प्रमुखांशी संवाद साधून जिल्ह्यातील विविध योजनांची माहिती घेतली. तसेच पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना भेटी देऊन पाहणी केली. शिक्षण, स्वच्छता, आरोग्य आणि जल जीवन मिशन यांसारख्या महत्त्वपूर्ण योजनांवर विशेष भर देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment