जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ। सरकारी नोकरी मिळविण्यासाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात होणाऱ्या भरतीची अधिसूचना नुकतीच जाहीर झाली आहे. दहावी ते पदवीधरांना नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. MIDC Bharti 2025
या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या http://www.midcindia.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. लक्ष्यात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 पर्यंत आहे. या भरतीद्वारे एकूण 749 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
रिक्त पदाचे नाव :
1) कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट-अ,
2) उप अभियंता (स्थापत्य),
3) उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी),
4) उप मुख्य लेखा अधिकारी,
5) सहायक अभियंता (स्थापत्य),
6) सहायक अभियंता (विद्युत/यांत्रिकी),
7) सहायक रचनाकार,
8) सहायक वास्तुशास्त्रज्ञ,
9) लेखा अधिकारी,
10) क्षेत्र व्यवस्थापक,
11) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),
12) लघुलेखक (उच्च श्रेणी),
13) लघुलेखक (निम्न श्रेणी),
14) लघुटंकलेखक
15) सहायक,
16)लिपिक टंकलेखक,
17) तांत्रिक सहायक (श्रेणी-२),
18) वरिष्ठ लेखापाल
19) विजतंत्री (श्रेणी-२)
20) पंपचालक (श्रेणी-२),
21) जोहारी (श्रेणी-२ ),
22)सहायक आरेखक,
23) अनुरेखक,
24) गाळणी निरीक्षक
25) भूमापक
26) अग्निशमन विमोचक..
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (ii) 03/07 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MBA (फायनान्स)
पद क्र.5: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
पद क्र.6: विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
पद क्र.7: स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्र/नगररचना पदवी
पद क्र.8: वास्तुशास्त्र पदवी
पद क्र.9: B.Com
पद क्र.10: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.11: स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.13: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.14: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.15: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.16: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT
पद क्र.17: B.Com
पद क्र.18: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
पद क्र.19: (i) ITI (विद्युत) (ii) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र
पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (तारयंत्री)
पद क्र.21: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (जोडारी)
पद क्र.22: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा ITI (आरेखन) (ii) Auto-CAD
पद क्र.23: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण.
पद क्र.24: B.Sc (केमिस्ट्री)
पद क्र.25: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण (ii) Auto-CAD
पद क्र.26: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन कोर्स (iii) MS-CIT
परीक्षा फी किती असेल?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना 1000/- फी भरावी लागेल. तर मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग उमेदवारांना 100/- फी लागेल.
वयाची अट : या भरती अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 38 वर्षे.[SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
शुद्धीपत्रक : येथे क्लीक करा
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा