---Advertisement---
बातम्या

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी वेबसिरीज ‘मी पुन्हा येईन’, टिझर पाहून उडेल झोप..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । राज्यात गेल्या महिन्यात राजकीय भूकंप घडवून आणणारी घटना घडली. ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेल्या बंडामुळे अडीच वर्षे सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावं लागलं होते. यावेळी शिंदे गटाने केलेला बंडाचा किस्सा देशभरात गाजला होता. यानंतर राज्यात सध्या शिंदे गट आणि भाजपचे स्थापन झाले असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहे. मात्र या दरम्यान राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी वेबसिरीज ‘मी पुन्हा येईन’, ही उद्या २९ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच या वेबसिरीजचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला होता. आता तो प्रत्येक्षात उद्या प्लॅनेट मराठी (Planet Marathi) ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. Mi Punha Yein web series

Mi Punha Yein 1 jpg webp

राजकीय विश्वातील सत्य घटनेवर आधारित अशा अनेक वेबसिरीज गेल्या एकही काळात आल्या आणि गाजल्यासुद्धा. यामध्ये प्लॅनेट मराठीवरील रानबझार चांगलीच चर्चेत असणारी वेब सिरीज आहे. या वेबसीरिजने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. यानंतर आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या गाजलेल्या डायलॉगचा टायटल म्हणून वापर करत ‘त्या’ चाळीस आमदारांवर झालेला गेम काय होता..? सत्ता नाट्य रंगलं कसं.? हे येऊ घातलेल्या या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे आता वेबसिरीजच्या टिझरनंतर प्रदर्शनाची उत्सुकता आहे.

---Advertisement---

या वेबसीरिजचे लिखाण व दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी केले आहे. तर निर्मिती प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मसह गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने केली आहे. या वेबसीरिजमध्ये अत्यंत प्रभावशाली असे कलाकार आपल्या कलेची प्रतिभा दर्शवतील. यामध्ये अभिनेते सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिका जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर याचा समावेश आहे.

Mi Punha Yein | A Planet Marathi Original (Official Trailer) | Akshay Bardapurkar | Arvind Jagtap

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---