---Advertisement---
हवामान

खान्देशात पाऊस न पाडण्याचे कारण काय? हवामान तज्ज्ञांचे सांगितलं कारण?..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२३ । पावसाची वाट पाहता पाहता जून संपून जुलै महिला सुरु होऊन पाच दिवस उलटले तरी देखील खान्देशात मुसळधार पावसाने हजेरी लावली नाहीय. यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आतापर्यंतच्या पावसाच्या एकूण सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांसह इतरांच्याही चिंता वाढल्या आहेत.

rain 5 jpg webp webp

धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ४ जुलैपर्यंतच्या एकूण सरासरीच्या ५० टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे. तर जळगाव जिल्ह्यात केवळ ३५ टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असली जळगाव जिल्ह्यात पावसाने निराश केलं आहे.

---Advertisement---

त्यातही जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास सुरुवात केली. त्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी देखील करून घेतल्या. मात्र आता पुन्हा पावसाने पाठ फिरविल्यानांतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांना पावसाअभावी पुन्हा दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची भीती आहे.

दरम्यान, आज बुधवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. त्यात भडगाव-2, भुसावळ-9.4,जामनेर-7, चोपडा-5, चाळीसगाव-16, रावेर-14, मुक्ताईनगर-4, यावल-12 इतका मिमी पाऊस झाल्याचं हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आले. मात्र समाधान कारक पाऊस होत नसून शेतकरी जोरदार पावसाची प्रतीक्षा करत आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला. पुढील चार दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

म्हणून खान्देशात पाऊस रुसला…

दरम्यान, बंगालच्या खाडीत कमी दाबाचे मजबूत क्षेत्र नसल्याने खान्देशासह उर्वरीत महाराष्ट्राकडे मान्सूनचे ढग, वारे खेचले जात नाही. त्यामुळे सद्यस्थितीत खान्देशात पाऊस होत नसल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणं आहे. दरम्यान, आगामी तीन ते चार दिवसांत बंगालच्या उपसागराकडे कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र विकसित झाले तर कोकण किनारपट्टीकडे मुक्कामी असलेल्या मान्सूनला गती येऊन, उर्वरित महाराष्ट्रात पाऊस होऊ शकतो. असा अंदाज व्यक्त केला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---