⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

अवकाळीचं संकट कधी दूर होणार? हवामान खात्याची पावसासंदर्भात मोठी अपडेट, जळगावात अशी राहील स्थिती?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२३ । ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाचे संकट ओढवलं आहे. मागील दोन दिवसापासून जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतीपिकाचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. त्यामुळे हे अवकाळीचं संकट कधी दूर होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशातच हवामान खात्याने पावसासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४८ तासांत राज्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात पुढील दोन तीन दिवस ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. त्यानंतर राज्यात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

या भागालाही इशारा
सोबतच विदर्भातील जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला असून अकोला आणि बुलढाण्यात आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.दुसरीकडे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.

दुसरीकडे मुंबईसह पुणे विभागाला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. मुंबईत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ठाण्यालाही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, जळगाव शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसात अवकाळीने हजेरी लावली. जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाली. आधी दुष्काळाच्या झळा आणि आता अवकाळीची अवकळा यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. आज जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान सहा अंशाने घसरले आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.