---Advertisement---
जळगाव जिल्हा धरणगाव

व्यापारी खून प्रकरण ; 15 लाखाच्या बॅगेतून पाच लाख गायब?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ डिसेंबर २०२१ । कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी (वय ३०,) याची शुक्रवारी रात्री पाळधी येथे हत्या झाली होती. याचा खून करणाऱ्या पोलिसासह सहा जणांची न्यायालयाच्या आदेशाने कारागृहात रवानगी झाली.असून,६ डिसेंबर रोजी या सर्वांची ओळख परेड होणार आहे. यात आणखी एक आरोपी वाढू शकतो, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. यातील पाच आरोपींना रविवारी रात्री ताब्यात घेतले होते. त्यानंतर सहाव्या आरोपीला सोमवारी सायंकाळी प्रजापत नगरातून अटक करण्यात आली.

या प्रकरणात जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा सहभाग आढळून आल्याने पोलीस दलही हादरले आहे. अटकेतील सहा जणांना धरणगाव न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडीची विनंती पोलिसांनी केली होती. दरम्यान, स्वप्नील यांच्याकडे असलेल्या बॅगेत १५ लाख २८ हजार ४५० रुपये इतके पेमेंट होते. घटनेनंतर १० लाख ३८ हजार ४५० रुपये बॅगमध्ये शिल्लक होते. त्यातील पाच लाख रुपये गायब झालेले होते. ही रक्कम नेमकी गेली कुठे याचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. यात फिर्यादी दिलीप चौधरी व पिंप्राळा येथील एका जणाची चौकशी करण्यात आली. ही रक्कम पिंप्राळ्यातील एका जणाकडे असल्याचे सांगितले जात असले तरी पोलिसांनी त्याला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---