---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

चर्चा तर होणारच ! विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे अन् भाजपच्या नेत्यांमध्ये भेट, राजकीय वर्तुळात खळबळ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२२ । राज्यातील विधान परिषद निवडून (Vidhan Parishad Election) प्रक्रिया सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एक मोठी राजकीय घडामोडी समोर आलीय. ती म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते राम शिंदे यांच्या भेट झाली आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तर राम शिंदे हे भाजपचे उमेदवार आहेत. मात्र, निवडणुकीपूर्वी या दोन्ही नेत्यांमध्ये काय बरं चर्चा झाली असेल? असा सवाल आता प्रत्येकाच्या मनात आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

eknath khadse ram shinde jpg webp

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षांनी आपल्या सर्व आमदारांना अलिशान हॉटेल्समध्ये ठेवलं आहे. राष्ट्रवादीने आपले आमदार हे हॉटेल ट्रयडंटमध्ये ठेवले आहेत. तर भाजपने आपले आमदार हॉटेल ताजमध्ये ठेवले आहेत. मात्र खडसे राष्ट्रवादीची बैठक संपवून हॉटेलमधून बाहेर येत असतानाच राम शिंदे हॉटेलमध्ये येत होते. एकनाथ खडसे आणि राम शिंदे हे आधी दोघेही भाजपमध्येच होते. मात्र काही महिन्यांपूर्वीच खडसेंनी भाजपची साथ सोडली आणि दोघं वेगवेगळ्या पक्षातून प्रतिस्पर्धी झाले. तरी यांच्यातला जिव्हाळा अजूनही तसाच आहे.

---Advertisement---

गेल्या दोन वर्षांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होऊन जवळपास दोन वर्ष झाली आहेत. राष्ट्रवादी खडसे यांचं राजकीय पूनर्वसन करु पाहत आहे. त्यातूनच त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. ही उमेदवारी खडसे यांनी जिंकली तर ते कदाचित महाविकास आघाडी सरकारमध्ये पुढे मंत्रीदेखील बनू शकतात.

दरम्यान आज सर्व राजकीय पक्षांच्या बैठका पार पडल्या आहेत. आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या महावकास आघाडीची बैठक होणार आहे. शरद पवार दिल्लीला जाणार असल्याने या बैठकीला गैरहजर राहणार आहेत. मात्र तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी दिली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---