जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२४ । दोन दिवसापूर्वी भुसावळ शहरात एमडी ड्रग्ज पकडल्याची कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. यानंतर आता जळगाव शहरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तरूणाला आणि ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या दोन जणांना शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. त्यांच्याकडून १२२ ग्रॅम वजनाचा ९ लाख ७७ हजार ७६० रूपये किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
इम्रान उर्फ इम्मा हसन भिस्ती रा. शाहू नगर, जळगाव आणि गोकूळ उर्फ रघु विश्वनाथ उमप (वय-४०, रा. कंजरवाडा) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत असे की जळगाव शहरातील शाहू नगरात एमडी ड्रग्जची विक्री होत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुधीर साळवे यांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल भवारी, पोउनि सर्जेराव क्षिरसागर, सहाय्यक फौजदार सुनील पाटील, पोहेकॉ भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, पोकॉ रतन गिते, अमोल ठाकूर, सुनील बडगुजर यांनी शाहू नगरात सापला रचला. शाहू नगरात पडक्या शाळेजवळ संशयित आरोपी इम्रान भिस्ती हा ड्रग्ज विक्रीसाठी येताच त्याला पाथकाने अटक केली.
त्याच्याजवळ तीन वेगवेगळ्या स्वरूपाच्या तीन पुड्यांसह एकुण ९ लाख ७७ हजार ७६० रुपये किमतीचे १२२ ग्रॅम वजनाचे ड्रग्ज आढळूल आले. शिवाय त्यांच्या जवळील दोन मोबाईलही जप्त केले आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने एमडी ड्रग्जचा साठा गोकुळ उमप यांच्या घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीसांनी संशयित आरोपी गोकुळ उमप यालाही अटक करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
विभागाीय पोलीस अधिक्षक संदीप गावीत, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि सर्जेराव क्षिरसागर, सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, पोहेकॉ भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, रतन गिते, अमोल ठाकूर, सुनिल बडगुजर, पोलीस नाईक सुधीर साळवे यांनी केली.