जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । जळगाव महापालिकेच्या इतिहासात शिवसेनेतर्फे प्रथमच महापौरपदी निवडून आलेल्या सौ. जयश्रीताई सुनील महाजन या आज दि. 22 मार्च रोजी सकाळी लवकर उठल्या. त्यांच्या व सुनीलभाऊंच्या चेहर्यावर यावेळी एक वेगळा आनंद व प्रसन्नता होती.
दोघांनी पटकन तयार होऊन आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले व देवदर्शन करून प्रेरणास्थान असलेल्या 7, शिवाजीनगर अर्थात आदरणीय सुरेशदादा जैन यांच्या बंगल्याकडे जाण्याकरिता प्रस्थान केले. रस्त्याने जाताना आपल्या स्नेहीस्वजनांकडे या दाम्पत्याचे औक्षण झाले. महापौर सौ. जयश्रीताई महाजन यांची कुलभवानीच्या आशीर्वादाने येवल्याच्या सुप्रसिद्ध पैठणीसह औटी भरण्यात आली. दोघे जण सुरेशदादा यांच्या बंगल्यावर पोहोचले. सद्यःस्थितीत ‘कोरोना’चा सवर्र्त्र थैमान सुरू असल्याने त्या पार्श्वभूमीवर आवश्यक टेम्प्रेचर चाचणी व सॅनिटायझरचा वापर करून सुरेशदादा बसतात त्या हॉलमध्ये हे दाम्पत्य दादांच्या लावलेल्या प्रतिमेखाली शांत अन् प्रसन्नचित्ताने बसले आणि त्यांनी दादांच्या आठवणी व आशीर्वाद घेऊन पुढील सामाजिक कार्याची प्रेरणाही घेतली.
आदरणीय सुरेशदादा जैन उपलब्ध नसल्याने त्यांच्या प्रतिमेस नमन करून मुंबईत असलेल्या रत्नाभाभीजींशी फोनवरून संपर्क केला. यावेळी भाभीजींनी सामाजिक कार्यात कर्तव्य श्रेष्ठ मानूल राजकारणाला दुय्यम स्थानावर ठेवून समाजातील सर्वच घटकांमध्ये समतोल राखत विकास कर आणि उत्तमोत्तम नागरी सुविधा जनतेला उपलब्ध करून देत शहराचा नावलौकिक वाढविण्यासह पारदर्शक कारभार व गतिमान प्रशासन करण्याची जबाबदारी महापौर नात्याने तुझीच आहे. तू उच्चशिक्षित, एकत्र कुटुंबातील असून, पती सुनील महाजन यांची खंबीर साथ तसेच नितीन लढ्ढा यांचे उत्तम मार्गदर्शन व सर्व शिवसैनिकांचे तुला सहकार्य मिळेल, असा आशीर्वाद दिला. त्याचबरोबर एक मौलिक सूचनाही केली, की निवडणूक संपल्याने आता खर्या अर्थाने जयश्री तू, उपमहापौर कुलभूषण पाटील आणि सवर्र् सहकार्यांनी राजकारण विसरून संपूर्णपणे समाजकारणाकडे प्रामुख्याने लक्ष देऊन जळगावचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे. त्यावर दादांचे आशीर्वाद जरी आमच्या पाठीशी असले, तरी त्यांची उणीव ही प्रकर्षाने जाणवेल, असे सौ. जयश्रीताई म्हणाल्या.
दादांच्या मार्गदर्शनात सर्व धर्म, पंथ आणि समाजघटकांना सोबत घेण्याची व प्रत्येक समाजाला नेतृत्वासह कर्तृत्व करण्याची संधी देण्याच्या या पद्धतीची उणीवही आम्हा दोघांना नक्की जाणवेल, असे सांगत महापौर सौ. जयश्रीताई भावनावश झाल्या. याचवेळी सुरेशदादांचे स्वीय सहाय्यक श्री. नागला व भावसार यांनी महापौर सौ. जयश्रीताई महाजन यांचा शाल, श्रीफळ व कंठमाळ देऊन यथोचित सत्कार केला. त्यानंतर 7, शिवाजीनगर या प्रेरणास्थानावर नतमस्तक होऊन महापौरपदाची सूत्रे स्वीकारण्याकरिता सौ. जयश्रीताई महापालिकेकडे मार्गस्थ झाल्या. यावेळी माझ्यासह तेथे उपस्थित सवार्र्ंच्या अर्थात सुरेशदादांचे स्वीय सहाय्यक श्री. नागला, भावसार, किशोर, संजय, प्रल्हाद पाटील, सुधाकर थोरात भावूक झाले होते. या प्रसंगातून अंगावर शहारे निर्माण झाले.
दादा, तुम्ही खरोखर ग्रेट आहात!
– ललित धांडे