कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या साहित्याची जबाबदारी घेणार ; आ गिरीश महाजन
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । राज्यात रक्ताचा तुटवडा पाहता सर्वत्र रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा जामनेर तालुका यांच्या वतीने दि २६ रोजी बाबाजी राघो पाटील मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता राज्याचे माजी मंत्री आमदार गिरिष महाजन यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून शिबिराचा शुभारंभ केला.
या वेळी ७०० रक्तदात्यांनी रक्तदानासाठी नोंदणी केली होती. परंतु कोरोना च्या पार्श्वभूमीवर ५१ रक्तदात्यांनीच रक्त दान करावे अशी माहिती तालुका युवक अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी दिली या वेळी दोन युवकांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान करून रक्तदान शिबिरास सुरवात केली. या प्रसंगी आमदार गिरिष महाजन यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या साहित्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टी, जामनेर तालुक्याच्या वतीने घेण्यात येईल अशी माहिती जामनेरात पत्रकारांशी बोलतांना भाजपा नेते आ गिरीश महाजन यांनी दिली .कोरोना या आजाराने सर्वत्र थैमान माजवल आहे , दिवसागणीक अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची मृत्यु पावल्याचे संख्या वाढीस लागत आहे.
सर्व सामान्य नागरिक घरातील नातेवाईकांना दवाखान्यात उपचारा साठी दाखल करतात , त्यांच्या उपचाराचा खर्च , व उपचार घेतांना रुग्ण दगावल्यास त्यांच्या वर करण्यात येत असलेले अंत्यसंस्कारा चा खर्च करने इतपत ही अनेकांची परिस्थिती राहत नाही. ही जाणीव ठेवता आपलं कर्तव्य म्हणून कोरोना आजाराने मयत झालेल्या रुग्णांचा अंत्यसंस्काराचा खर्च जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात येईल व स्मशानभूमी पर्यंत गाडीची व्यवस्था मोफत करण्यात येईल. तालुकभरासह जिल्हाभर कोईड च्या पार्श्वभूमीवर आपण स्वतः व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रुग्णसेवा अहोरात्र करीत आहोत याची पूर्ण माहिती जनतेला असून कुणीतरी हातात पोश्टर घेऊन आमदार गेले कुठे ही चमकोगिरी थांबवून त्यांनीही अश्या परिस्थितीत जनसेवा करावी असा टोलाही आ महाजन यांनी लगावला शहरातील बाबाजी राघो मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले.
यावेळी आ गिरीश महाजन यांनी भेट दिली. सर्व नागरीकांनी स्वताः सह इतरांची काळजी घ्या , दिलेले शासन आदेश सुचना पाळा असे आवाहन ही केले.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे, जिल्यातील पदाधिकारी, ता अध्यक्ष चंद्रकांत बावस्कर, जितेंद्र पाटील, युवक अध्यक्ष निलेश चव्हाण, मयूर पाटील, सुभाष पवार नगरसेवक प स सभापती, सदस्य, जि प सदस्य कार्यकर्ते हजर होते.