जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२४ । या वर्षात १६ जानेवारीपासून लग्नाचे मुहूर्त सुरू झाले असून १२ जानेवारी ते ८ फेब्रुवारीपर्यंत पौष महिना होता.पौष महिन्यात लग्न करत नाहीत, असे पूर्वीपासून मानले जाते. तरीही बहुतांश लोकांनी पौष महिन्यातही लग्नाचा बार उडवून टाकला. यातच आता यंदा मे महिन्यात मुहूर्त नसल्याने मार्च महिन्यात लग्नसोहळा उरकविण्याची लगबग सुरू आहे.
यावर्षी पौष महिन्यात लग्नाचे १७ मुहूर्त होते. पूर्वीच्या काळापासून पौष महिन्यात शुभ कार्य न करण्याचा प्रघात आहे. या महिन्यात लग्नाव्यतिरिक्त, साखरपुडा, नवीन घराची घरभरणी, नवीन विहिर व घराचे बांधकाम करणे, इत्यादी शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानने जाते. मात्र, तरीही मे महिन्यात मुहूर्तच नसल्याने काही जणांनी पौष महिन्यातच मुहूर्त साधून लग्नाचे बार उडविले.
यावर्षी मे महिन्यात शुभकार्यासाठी मुहूर्त नाहीत. त्यामुळे एप्रिलपर्यंत मुहूर्त पाहिले जात आहेत. त्यामुळे पौष महिन्यातील मुहूर्तातही लग्नसोहळे पार पडले. फेब्रुवारीनंतर आता मार्च महिन्यात बहुतांश यजमान लग्नसोहळे पार पाडण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.
असे आहेत मुहूर्त
मार्च : १, ३, ४, ५, ६, ७, ११, १२.
एप्रिल १८, १९, २०, २१, २२, २३, २४, २५, २६,
जुलै : ०९, १०, ११, १२, १३, १४, १५, १६, १७,
नोव्हेंबर १७, १८, २२, २३, २४, २५
डिसेंबर: २, ३, ४, ५, ९, १०, ११, १३, १४, १५,