fbpx

आजचे राशिभविष्य : २५ मे २०२१

mi-advt

मेष

आजचा दिवस आपणासाठी अतिशय उत्तम असणार आहे. नाविन्यपूर्ण उत्साह, नवीन उमेद यांचा आज अनुभव घ्याल. आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव देऊन सौख्याचा अनुभव घ्याल.

वृषभ

आजच्या दिवशी आपण घरातील कामांमध्ये रममाण राहाल. आज आपले घर आपली वास्तू स्वच्छ, टापटीप, नीटनेटकी ठेवण्याकडे आपला कल राहील. गृहसौख्याचा आस्वाद घ्याल.

 मिथुन

आजच्या दिवशी काही धाडसी, महत्त्वपूर्ण कामे आपल्या बुद्धिचातुर्याने हातावेगळी कराल आज आपल्या काही आवडीनिवडी जोपासण्याकडे कल राहील.

कर्क

आज उत्तम कौटुंबिक सौख्याचा लाभ घ्याल. आजच्या दिवशी कुटुंबातील व्यक्तींचे प्रेम व सहकार्य लाभेल. कुटुंबियांबरोबर एखाद्या सुखद वार्तेने आनंद द्विगुणित होईल

सिंह

बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आजचा उत्तम दिवस आज आलेला आहे. त्याचा योग्य नियोजन करून लाभ अवश्य करून घ्या. आज नवचैतन्याचा, उत्साहाचा अनुभव घ्याल.

कन्या

आजच्या दिवशी काहीसे शारीरिक, मानसिक, आर्थिक अस्थैर्य जाणवू शकते. काही अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात. आजच्या दिवशी मन व चित्त शांत ठेवणे आवश्यक राहील.

तुळ

आजचा आपला दिवस लाभप्राप्ती, इच्छाप्राप्तीचा असेल. आज आपल्यातील कलागुणांनी आपली एक वेगळी सकारात्मक प्रतिमा निर्माण कराल. आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल.

वृश्चिक

आजचा आपला दिवस कर्मप्रधान, कर्तव्य प्रधान असेल. आपल्या धाडसी, आक्रमक स्वभावाला अनुसरून आज कर्म कराल व त्यातून आनंदाची प्राप्ती कराल.

धनु

आजचा आपला दिवस हा भाग्यप्राप्ती, सौख्यप्राप्तीचा असेल. बऱ्याच दिवसांपासून मनात असलेल्या काही इच्छांची आज पूर्तता संभवते.

मकर

आजच्या दिवशी काही अडीअडचणी, अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. आज प्रकृती व मानसिक अस्वास्थ्य जाणवू शकते. विनाकारण वाद-विवाद, कटकटी सारखे प्रसंग टाळा.

कुंभ

आजच्या दिवशी उत्तम वैवाहिक सौख्याचा आस्वाद घ्याल. जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य लाभेल. आजच्या दिवशी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल.

मीन

आजच्या दिवशी काहीसे प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपली योग्यता, कर्तुत्व यांची फारशी दखल आज घेतली जाणार नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज