---Advertisement---
जळगाव जिल्हा

प्रवाशांनो लक्ष द्या! एप्रिल-मे महिन्यात जळगाव, भुसावळ मार्गे धावणाऱ्या अनेक ट्रेन रद्द, वाचा गाड्यांची यादी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२५ । आरामदायक, स्वस्त आणि सोयीस्कर प्रवासासाठी देशातील अनेक लोक रेल्वेनं प्रवास करतात. सध्या उन्हाळी हंगाम सुरु असून यादरम्यान सुट्ट्यांच्या कालावधीत अनेक कुटुंब बाहेर गावी जाण्याचा प्लॅन करतात. यामुळे रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी दिसून येते. मात्र यातच रेल्वेकडून विविध तांत्रिक कारणांमुळे रेल्वे गाड्या रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

train jpg webp

अशातच गोरखपूर जंक्शन ते गोरखपूर कॅन्ट डिव्हिजन मार्गावर इंटरलॉकिंग काम सुरू आहे, ज्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ईशान्य रेल्वेने एप्रिल आणि मे महिन्यात याच मार्गावर काही गाड्या रद्द केल्या आहेत. विशेष जळगाव भुसावळ मार्गे धावणाऱ्या अनेक गाड्यांच्या यात समावेश असून त्यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाची योजना पुन्हा तपासून पाहण्याचा सल्ला दिला जात आहे.

---Advertisement---

संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे:
ट्रेन क्र. ११०३७ पुणे-गोरखपूर एक्सप्रेस २ मे २०२५ रोजी रद्द करण्यात आली आहे, प्रवाशांनी सूचित केले आहे.
ट्रेन क्रमांक ११०३८ गोरखपूर-पुणे एक्सप्रेस ३ मे २०२५ रोजी रद्द करण्यात आलेली आहे, प्रवाशांनी कृपया तपासा.
ट्रेन क्रमांक १२५११ गोरखपूर-कोचुवेली एक्सप्रेस २७ एप्रिल, १, २ आणि ४ मे २०२५ रोजी रद्द राहील.
ट्रेन क्रमांक १२५१२ कोचुवेली-गोरखपूर एक्सप्रेस ३० एप्रिल, ४, ६ आणि ७ मे २०२५ रोजी रद्द राहील.
ट्रेन क्र. १२५८९ गोरखपूर-सिकंदराबाद एक्सप्रेस ३० एप्रिल २०२५ रोजी रद्द राहील.
ट्रेन क्रमांक १२५९० सिकंदराबाद-गोरखपूर एक्सप्रेस १ मे २०२५ रोजी रद्द राहील.
ट्रेन क्रमांक १२५९१ गोरखपूर-यशवंतपूर एक्सप्रेस २६ एप्रिल २०२५ रोजी रद्द राहील.
ट्रेन क्र. १२५९२ सिकंदराबाद-गोरखपुर एक्सप्रेस २८ एप्रिल २०२५ रोजी रद्द राहील.
ट्रेन क्र. १२५९२ सिकंदराबाद-गोरखपुर एक्सप्रेस २८ एप्रिल २०२५ रोजी रद्द राहील.

ट्रेन क्रमांक १२५९८ छत्रपती शिवाजी महाराज टी. गोरखपूर एक्सप्रेस ३० एप्रिल २०२५ रोजी रद्द राहील.
ट्रेन क्रमांक १५०१७ लोकमान्य टिळक टी. गोरखपूर एक्सप्रेस २७ एप्रिल ते ३ मे २०२५ पर्यंत रद्द राहील.
ट्रेन क्रमांक १५०१८ गोरखपूर-लोकमान्य टिळक टी. एक्सप्रेस २७ एप्रिल ते ३ मे २०२५ पर्यंत रद्द राहील.
ट्रेन क्रमांक १५०२३ गोरखपूर-यशवंतपूर एक्सप्रेस २९ एप्रिल २०२५ रोजी रद्द राहील.
ट्रेन क्र. १५०२४ यशवंतपूर-गोरखपूर एक्सप्रेस १ मे २०२५ रोजी रद्द राहील.
१५०२९ गोरखपूर-पुणे एक्सप्रेस ही गाडी १ मे २०२५ रोजी रद्द राहील.
ट्रेन क्र. १५०३० पुणे-गोरखपूर एक्सप्रेस ३ मे २०२५ रोजी रद्द राहील.
ट्रेन क्र. १५०४५ गोरखपूर-ओखा एक्सप्रेस १ मे २०२५ रोजी रद्द राहील.
ट्रेन क्रमांक १५०४६ ओखा-गोरखपूर एक्सप्रेस २७ एप्रिल आणि ०४ मे २०२५ रोजी रद्द राहील.
ट्रेन क्रमांक १५०६५ गोरखपूर-पनवेल एक्सप्रेस २८, २९ एप्रिल आणि १, २, ४ मे २०२५ रोजी रद्द राहील.

ट्रेन क्रमांक १५०६६ पनवेल-गोरखपूर एक्सप्रेस २८, २९, ३० एप्रिल आणि २, ३, ५ मे २०२५ रोजी रद्द राहील.
ट्रेन क्र. १५०६७ गोरखपूर-वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस ३० एप्रिल २०२५ रोजी रद्द राहील.
ट्रेन क्रमांक १५०६८ वांद्रे टर्मिनस गोरखपूर एक्सप्रेस २ मे २०२५ रोजी रद्द राहील.
ट्रेन क्रमांक २०१०३ गोरखपूर-लोकमान्य तिलक टी. एक्सप्रेस २८ एप्रिल ते २ मे २०२५ पर्यंत रद्द राहील.
ट्रेन क्रमांक २०१०४ लोकमान्य टिळक टी. गोरखपूर एक्सप्रेस २८ एप्रिल ते ३ मे २०२५ पर्यंत रद्द राहील.
२२५३३ गोरखपूर-यशवंतपूर एक्सप्रेस ही गाडी २८ एप्रिल २०२५ रोजी रद्द राहील.
ट्रेन क्र. २२५३४ यशवंतपूर-गोरखपूर एक्सप्रेस ३० एप्रिल २०२५ रोजी रद्द राहील.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment