---Advertisement---
जळगाव जिल्हा भुसावळ

प्रवाशांनो लक्ष द्या! आजपासून भुसावळ विभागातून धावणाऱ्या पठाणकोट, सचखंडसह ‘या’ रेल्वे गाड्या रद्द

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । 23 जानेवारी 2024 । भुसावळ विभागातून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी असून रेल्वे प्रशासनाने आग्रा विभागातील मथुरा स्टेशन येथे यार्ड रिमॉडलिंग तर पलवल-मथुरा दरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम हाती घेतलं आहे. या कामासाठी ब्लॉक घेण्यात आला असणं यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. यात आज म्हणजेच २३ जानेवारीपासून अनेक गाड्या रद्द झाल्या. यामुळे प्रवाशांना मोठा गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

train jpg webp

आजपासून पुढील काही दिवस या गाड्या रद्द
गाडी क्रमांक ११०५८ अमृतसर-दादर पठाणकोट एक्सप्रेस आज म्हणजेच २३ जानेवारीपासून ते ०६ फेब्रुवारी पर्यंत रद्द करण्यात आली आहे. तसेच गाडी क्रमांक १२१७२ हरिद्वार-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपर एक्सप्रेस दिनांक २३.०१.२४ ते ०२.०२.२४ पर्यंत रद्द. गाडी क्रमांक १२६२९ यशवंतपूर -हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २३.०१.२४ ते ०१.०२.२४ पर्यंत रद्द.

---Advertisement---

गाडी क्रमांक १२७१६ अमृतसर- नांदेड सचखंड एक्सप्रेस देखील आज २३ जानेवारीपासून ते ६ फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक २२६८६ चंदिगढ-यशवंतपूर एक्सप्रेस देखील आज २३.०१.२४ ते ०६.०२.२४ पर्यंत रद्द करण्यात आली. गाडी क्रमांक १२७५३ नांदेड- हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २३.०१.२४ आणि ३०.०१.२४ रोजी रद्द

दरम्यान, रेल्वेच्या विविध विभागात नॉन इंटरलॉकिंगच्या कामामुळे रेल्वे गाड्या रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा मोठा सामना करावा लागतोय. सणासुदीत देखील या कामासाठी अनेक गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये संताप होता.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---