⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

महत्वाची बातमी : चाळीसगावच्या ब्लॉकमुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द, ‘या’ गाड्यांच्या मार्गात बदल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२४ । रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव स्थानकावर यार्ड रीमॉडेलिंगसाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी 16 एप्रिल रोजी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे भुसावळ-इगतपुरी, देवलाली-भुसावळ सह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

ब्लॉकमुळे या गाड्यांवर होणार परिणाम
ब्लॉक कालावधीः अप आणि डाऊन मार्गांवर 16 एप्रिल रोजी सकाळी 07.00 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत
भुसावळ विभागात मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन – डाऊन गाड्या
1) ट्रेन क्रमांक 12779 वास्को द गामा – हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस दीड तासासाठी नियमित केली जाईल.
2) ट्रेन क्रमांक 22455 साई नगर शिर्डी – कालका एक्सप्रेस 0.15 मिनिट साठी नियमित केली जाईल.
3) ट्रेन क्रमांक 12336 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोड्डा एक्सप्रेस 0.20 मिनिटसाठी नियमित केली जाईल.
4) ट्रेन क्रमांक 12534 मुंबई-लखनौ एक्सप्रेस 0.15 मिनिटसाठी नियमित केली जाईल.
अप गाड्या -:
ट्रेन क्रमांक 11078 जम्मू तवी – पुणे एक्स्प्रेस विभागात 04.15 तासांपर्यंत नियमित केली जाईल.
ट्रेन क्रमांक 12780 हजरत निजामुद्दीन-वास्को द गामा गोवा एक्सप्रेस विभागात 02.25 तासांपर्यंत नियमित केली जाईल.
ट्रेन क्रमांक 15018 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात 1.45 तासांसाठी नियमित केली जाईल.
ट्रेन क्रमांक 15946 दिब्रुगढ – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात 1.40 तासांपर्यंत नियमित केली जाईल.

दिनांक 16.04.2024 रोजी या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
ट्रेन क्रमांक 20103 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस 05.23 वाजेऐवजी 08.23 वाजता सुटेल.
ट्रेन क्रमांक 12859 मुंबई – हावडा एक्सप्रेस 06.00 वाजेऐवजी 08.55 वाजता सुटेल.
ट्रेन क्रमांक 22129 लोकमान्य टिळक टर्मिनस – अयोध्या कँट एक्सप्रेस 06.00 वाजेऐवजी 09.05 वाजता सुटेल.
ट्रेन क्रमांक 15017 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस 06.35 वाजता ऐवजी 09.20 वाजता सुटेल.

या गाड्या रद्द
ट्रेन क्रमांक 11113 देवलाली-भुसावळ मेमू दिनांक 15.04.2024 आणि 16.04.2024 रोजी रद्द.
ट्रेन क्रमांक 11114 भुसावळ – देवलाली मेमू दिनांक 14.04.2024 आणि 15.04.2024 रोजी रद्द
ट्रेन क्रमांक 11120 भुसावळ – इगतपुरी मेमू दिनांक 15.04.2024 आणि 16.04.2024 रोजी रद्द.
ट्रेन क्रमांक 11119 इगतपुरी-भुसावळ मेमू दिनांक 16.04.2024 आणि 17.04.2024 रोजी रद्द.
ट्रेन क्रमांक 11011 मुंबई – धुळे एक्सप्रेस मेमू दिनांक 14.04.2024 आणि 15.04.2024 रोजी रद्द
ट्रेन क्रमांक 11012 धुळे-मुंबई एक्सप्रेस मेमू दिनांक 15.04.2024 आणि 16.04.2024 रोजी रद्द.
ट्रेन क्रमांक 01211 बडनेरा-नाशिक मेमू दिनांक 14.04.2024 ते 16.04.2024 पर्यंत रद्द
ट्रेन क्रमांक 01212 नाशिक-बडनेरा मेमू दिनांक 14.04.2024 ते 16.04.2024 पर्यंत रद्द.
ट्रेन क्रमांक 01304 धुळे – चाळीसगाव मेमू दिनांक 16.04.2024 रोजी रद्द
ट्रेन क्रमांक 01307 चाळीसगाव-धुळे मेमू दिनांक 16.04.2024 रोजी रद्द

या गाड्यांच्या मार्गात बदल
ट्रेन क्रमांक 12168 बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस प्रवास ही 15.04.2024 रोजी जळगाव, उधना, वसईरोड, दिवा मार्गे वळवली जाईल.
गाडी क्रमांक 12880भुवनेश्वर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस प्रवास ही दिनांक 15.04.2024 रोजी जळगाव, उधना, वसईरोड, दिवा मार्गे वळवली जाईल.
गाडी क्रमांक 12142 पाटलीपुत्र – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसला दिनांक 15.04.2024 रोजी जळगाव, उधना, वसईरोड, दिवा मार्गे वळवली जाईल.
ट्रेन क्रमांक 15065 गोरखपूर – पनवेल एक्सप्रेसला 15.04.2024 रोजी जळगाव, उधना, वसईरोड मार्गे वळवली जाईल.
गाडी क्रमांक 11060 छपरा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसला 15.04.2024 रोजी जळगाव, उधना, वसईरोड, दिवा मार्गे वळवली जाईल.