---Advertisement---
जळगाव जिल्हा

पहलगाम मध्ये जळगाव, चाळीसगावमधील अनेक पर्यटक अडकले

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२५ । जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निरपरांधाचा बळी गेला. त्यामध्ये भारतीय पर्यटकांसह काही विदेशी नागरिकांचाही समावेश होता. दरम्यान जळगावच्या चाळीसगाव येथील भाजपच्या देवयानी ठाकरे या 14 जणांसह काश्मीरमध्ये अडकल्या आहेत. तर जळगावातील शिव कॉलनीतील नेहा वाघुळदे ह्या मैत्रिणींच्या ग्रुपसोबत पहलगाम मध्ये अडकल्या आहेत.

pahalgam

चाळीसगाव येथील भाजपच्या देवयानी ठाकरे या भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष असून त्या त्यांचे पती व सहकाऱ्यांसोबत काश्मीरला फिरण्यासाठी गेल्या होत्या. सध्या त्या श्रीनगर मध्ये एका सुरक्षित ठिकाणी असल्याचं परिवाराकडून सांगण्यात आलं आहे.सध्या संपूर्ण काश्मीरमध्ये हाय अलर्टजारी करण्यात आला आहे. देवयानी ठाकरे लवकरच आपल्या सहकाऱ्यांसोबत महाराष्ट्रात परतणार आहेत.

---Advertisement---

जळगावच्या खासदार स्मिता वाघ तसेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे त्यांच्या संपर्कात आहेत. 25 तारखेची त्यांची विमानाचे तिकीट बुक झालेले आहे, त्या लवकरच महाराष्ट्रात येतील, असंही त्यांनी सांगितलं. भीती पसरवण्यासाठी हा दहशतवादी हल्ला झाला आहे, माझी आई वडील व त्यांच्यासोबतचे सहकारी सुरक्षित असून 25 तारखेला ते महाराष्ट्रात परत येणार आहे असं ते म्हणाले.

जळगावची महिलाही अडकली काश्मीरमध्ये
तर जळगावातील शिव कॉलनीतील नेहा वाघुळदे ह्या पहलगाम मध्ये अडकल्या आहेत. त्या 16 तारखेपासून मैत्रिणींच्या ग्रुपसोबत काश्मीर फिरायला गेल्या होत्या. यादरम्यान नेहा वाघुळदे यांचं त्यांचे पती तुषार वाघुळदे यांच्यासोबत फोनवर बोलणं झालं होतं. याच परिसरात नेहा वाघुळदे ह्या फिरून आल्यानंतर , त्या लॉजवर आल्या. तेथे त्या थांबल्या असताना दुसरीकडे दहशतवादी यांनी हल्ला केला, अस नेहा यांनी सांगितल्याचं तुषार यांनी नमूद केलं.

पत्नीशी बोलणं झालं त्यावेळी त्यांना सैन्य दलाने सुरक्षित स्थळे हलवल्याची माहिती दिली. व्हॉट्सॲप मेसेज द्वारे त्या संवाद साधत असल्याचं तुषार यांनी नमूद केलं. 28 रोजी नेहा वाघुळदे तसेच त्यांच्या सर्व ग्रुप हा परत जळगावला परतणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment