⁠ 
रविवार, सप्टेंबर 29, 2024
Home | बातम्या | बोदवडमध्ये ठाकरे गटाला धक्का! अनेक पदाधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

बोदवडमध्ये ठाकरे गटाला धक्का! अनेक पदाधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२४ । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बोदवडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे पक्षाचे बोदवड तालुकाध्यक्ष गजानन खोडके यांच्यासह बोदवड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

गजानन खोडके, असलम शेख, संजय महाजन, इस्राईल शेख शिंदे गटात पक्ष प्रवेश सोहळा केला आहे.याप्रसंगी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन अल्पसंख्यांक आघाडीचे अफसर शेख, उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, सोशल मीडिया प्रमुख शिवराज पाटील, मुक्ताईनगरचे तालुकाप्रमुख नवनीत पाटील, बोदवड तालुकाप्रमुख प्रमोद धामोडे, बोदवड शहर प्रमुख गणेश टोंगे, हर्षल बडगुजर, राजेशशेठ ननवणी, बोदवड शहरप्रमुख दिनेश माळी, बोदवडचे उपनगराध्यक्ष संजय गायकवाड, सुनील बोरसे, विजय पाटील, राहुल शर्मा यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, जळगाव ग्रामीण मध्ये देखील मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून अनेकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.