जळगाव लाईव्ह न्यूज । 26 फेब्रुवारी 2024 | आंतरवाली सराटी येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. जरांगे पाटील हे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असून उद्यापासून साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात उपोषण झाले. गेल्या काही दिवसापूर्वी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या १७ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते.
आज जरांगे पाटील यांनी हे उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. जरांगे पाटील हे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असून उद्यापासून साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच मराठा आंदोलनाची पुढील दिशा येत्या दोन दिवसात स्पष्ट करु.. असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, काल पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मनोज जरांगे पाटील हे फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे निघाले होते. जरांगेंच्या या भूमिकेमुळे राज्यभरात मराठा बांधवही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र आज मनोज जरांगे पाटील यांनी भांबेरी गावातून पुन्हा जालन्याकडे परतण्याचा निर्णय घेतला.