जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या राज्य सहसचिवपदी मनोज भालेराव यांची निवड
जळगाव लाईव्ह न्यूज | १८ एप्रिल २०२२ । जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत राज्य सहसचिवपदी मनोज भालेराव यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यातील नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू नाही. त्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना ही संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. या संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव यांची संघटनेच्या राज्य सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष शिवराम घोती तसेच राज्य पदाधिकारी यांनी नेमणूक केली.
याप्रसंगी संघटनेचे राज्य सचिव सचिनकुमार चव्हाण, राज्य कार्याध्यक्ष युवराज कलशेट्टी, राज्य उपाध्यक्ष शशिकांत पाटील, राज्य कोषाध्यक्ष गजानन टांगले, राज्य सल्लागार तेजराम बांगडकर, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रवीण भोगे, यशवंत कातरे, नितीन भोईटे, केशवानंदन बमनोटे आदी उपस्थित होते.