जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२४ । सध्या जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला असून तापमान वाढीने अनेक धरणातील जलसाठा खालावला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा हतनूरमध्ये कमी जलसाठा शिल्लक आहे. पावसाळा लांबल्यास हतनूर धरणावर अवलंबून असलेल्या शहर, गावे आणि प्रकल्पांना यंदा तीव्र टंचाईच्या झळा सोसावे लागू शकतात.
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या वर्षी मे महिन्यात अवकाळी पाऊस झाल्याने साठा वाढला होता. पण, त्यानंतर गेल्या पावसाळ्यात परतीचा पाऊस झाला नाही. तसेच यंदा अवकाळी पाऊस सुद्धा नसल्याने धरणाच्या साठा वाढला नाही. यामुळे गतवर्षीची तुलना करता यंदा १२.४६ टक्के साठा कमी आहे. गेल्या वर्षी धरणात ५२ टक्के साठा होता, तो यंदा फक्त २९.२२ टक्के आहे.
मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात हतनूर धरणातील जलसाठ्याचे दररोज बाष्पीभवन होते. गेल्या वर्षों में महिन्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला होता. यामुळे साठ्यात वाढ झाली होती. हतनूरमध्ये साधारण जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पाण्याची आवक होते. यामुळे तोपर्यंत जलसाठा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.
सध्या तापमान ४३ अंशपिक्षा जास्त आहे. यामुळे धरणातील बाष्पीभवनाचे प्रमाणही अधिक आहे. परिणामी गतवर्षी तुलनेत यंदा साठा १२.४८ टक्के कमी आहे. हा साठा जून अखेरपर्यंत टिकेल किंवा नाही? याची शाश्वती नाही. शिवाय पाऊस लांबला तर धरणावर अवलंबून असलेल्या गावांना टंचाईची निर्माण होऊ शकते. पूण तूर्त तशी कोणतीही शक्यता नाही.