जामनेर तालुक्यात चक्रीवादळासह मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान
जळगाव लाईव्ह न्युज | ७ सप्टेंबर २०२१ | जामनेर तालुक्यातील अनेक गावामध्ये रात्री झालेल्या चक्रीवादळासह मुसळधार पावसामुळे नुकसान झाले आहे. झालेल्या हे नुकसानीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
तालुक्यातील ओझर गावांमध्ये सोमवार रोजी रात्रीच्या सुमारास चक्रीवादळ अतिवृष्टी झाली यामध्ये सुमारे ९० टक्के गावातील नागरिकांचे घरावरील पत्रे उडाले. घराची पडझड झाली. त्याचबरोबर संसार उपयोगी साहित्य यांचे मोठे नुकसान झाला आहे. भागदरा या गावाजवळील गाव तलाव फुटल्यामुळे संपूर्ण गावात पाणी शिरले. तर अनेक शेतातील कपाशी वाहून गेली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तसेच तोंडापूर या गावामध्ये नदीला पूर आल्यामुळे दोघ गावाचा संपर्क तुटला आहे. यावेळी गावातील दोन जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे शासन स्तरावर तात्काळ संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करावे अशी नागरिकांची मागणी आहे.