---Advertisement---
बातम्या महाराष्ट्र राजकारण

महायुती सरकारच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला? कोणाला कोणतं खातं मिळणार?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२४ । महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार १५ डिसेंबर रोजी नागपुरात राजभवनात पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान, शपथविधीनंतर आता खातेवाटप कधी होणार? याची चर्चा सुरु असताना त्याबाबत मोठी माहिती हाती आली आहे. महायुतीचं खातेवाटप अखेर ठरलं असून येत्या २४ तासांत अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.

Mahayuti 2

येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण खातेवाटपाची यादी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना देणार असल्यामुळे राज्याचे नवे मंत्री लवकरच कामकाजाला लागणार आहेत. शिवसेनेच्या कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती दिली जाणार याची यादी आज रात्रीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली जाणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अंतिम खातेवाटपाची यादीही आज किंवा उद्यापर्यंत दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महायुतीचा खातेवाटपचा फॉर्म्युला अखेर ठरल्याचे बोललं जात आहे.

---Advertisement---

कोणाला कोणतं खातं मिळणार?
दरम्यान समोर आलेल्या खातेवाटपाच्या फॉर्म्युलानुसार भाजपकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ऊर्जा ही चार खाती असणार आहेत. तर शिवसेनेकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं असेल. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीकडे अर्थ खातं आणि उत्पादन शुल्क खातं असेल, अशी माहिती समोर येत आहे.

गृहखातं अखेर भाजपकडे
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून महायुतीत तिढा निर्माण झालेले गृहखातं अखेर भाजपला मिळणार असल्याचे बोललं जात आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये गृहखात्यावरुन मोठा वाद झाला होता. मात्र अखेर भाजप स्वत:कडे गृहखाते ठेवण्यास यशस्वी झाली आहे. तसेच शिवसेनेकडे नगरविकास खाते दिले जाणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---