---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या महाराष्ट्र राजकारण

नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न ; कोण-कोणी घेतली मंत्रिपदाची शपथ? जाणून घ्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२४ । फडणवीस सरकारचा आज रविवारी पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ज्यात भाजपच्या सर्वाधिक 19 मंत्र्यांनी शपथ घेतली, तर शिवसेना शिंदे गटाच्या 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर आता नव्या मंत्र्यांची यादी समोर आली आहे.

mahayuti shapathvidhi

दरम्यान या नव्या मंत्रिमंडळाचं वैशिष्ट म्हणजे या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, त्यामुळे काही अनुभवी नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाहीये, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांची देखील मंत्रिपदाची संधी हुकली आहे. भाजपकडून रवींद्र चव्हाण यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

---Advertisement---

कोणी घेतली मंत्रिपदाची शपथ?
भाजप :
चंद्रशेखर बावनकुळे राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत पाटील गिरीश महाजन गणेश नाईक मंगलप्रभात लोढा जयकुमार रावल पंकजा मुंडे अतुल सावे अशोक उईके आशिष शेलार संजय सावकारे नितेश राणे आकाश फुंडकर माधुरी मिसाळ – राज्यमंत्री पंकज भोयर – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – राज्यमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिवसेना
गुलाबराव पाटील दादा भुसे संजय राठोड उदय सामंत शंभूराज देसाई संजय शिरसाट प्रताप सरनाईक भरत गोगावले प्रकाश आबिटकर आशीष जैस्वाल – राज्यमंत्री योगेश कदम – राज्यमंत्री

राष्ट्रवादी
हसन मुश्रीफ धनंजय मुंडे दत्तात्रय भरणे आदिती तटकरे माणिकराव कोकाटे नरहरी झिरवळ मकरंद जाधव बाबासाहेब पाटील इद्रनील नाईक

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---