जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । ITI उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची संधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत विविध पदे भरण्यासाठीची अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार www.mahatransco.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. Mahatransco Recruitment 2023
यासाठी 20 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 10 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
पदाचे नाव व भरतीसाठी आवश्यक पात्रता :
1) वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 124
शैक्षणिक पात्रता : (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव
2) तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 200
शैक्षणिक पात्रता : (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव
3) तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 314
शैक्षणिक पात्रता : (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 02 वर्षे अनुभव
4) विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) 1903
शैक्षणिक पात्रता : ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार
मिळणार पगार –
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) – रु. 30810/- ते 88190/-
तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) – रु. 29935/- ते 82430/-
तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) – रु. 29035/- ते 72875/-
विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) –
प्रथम वर्ष – 15000/-
द्वितीय वर्ष – 16000/-
तृतीय वर्ष – 17000/-
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क।
पद क्र.1 ते 3: खुला प्रवर्ग: ₹600/-, [मागासवर्गीय/आ.दु.घ: ₹300/-]
पद क्र.4: खुला प्रवर्ग: ₹500/-, [मागासवर्गीय/आ.दु.घ: ₹250/-]
जाहिरात पाहण्यासाठी :
पद क्र.1 ते 3: पाहा
पद क्र.4: पाहा
Online अर्ज: Apply Online