⁠ 
शनिवार, मे 18, 2024

महापारेषणमध्ये 24 जागांसाठी भरती, 10वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२२ । महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी यवतमाळ येथे अपरेंटिस इलेक्ट्रीशियन या पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (MahaTransco Recruitment 2022) करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 असणार आहे.

एकूण जागा – 24

पदाचे नाव : अपरेंटिस इलेक्ट्रीशियन (Apprentice – Electrician) –

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.यानंतर उमेदवारांनी संबांधित इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा औद्योगिक महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी भरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वेतन : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील

काही महत्त्वाच्या सूचना :

ही पदभरती तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे.ऑफिशिअल वेबसाईटवर उमेदवारांना आपलं प्रोफाइल अपडेट करावं लागणार आहे. ज्या उमेदवाराचं प्रोफाइल अपडेट राहणार नाही अशा उमेदवारांना पद्भारतीदरम्यान अपात्र ठरवलं जाईल.

ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा), दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी),
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो.

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, आउदा संवयु विभाग, उद्योग भवन, चौथा माळा, दारव्हा रोड, यवतमाळ 445001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2022

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :