जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. कंपनीअंतर्गत ७ परिमंडल कार्यालयेअंतर्गत अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी येथे भरती केली जाणार आहे. Mahatransco Bharti 2025

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत निम्नस्तर लिपिक पदे भरती केली जाणार आहे. महाट्रान्स्को २६० जागा रिक्त आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. Mahatransco Recruitment 2025
या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे.या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १० मार्चपासून सुरु होण्याची शक्यता आहे.१८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. पर्मनंट नोकरी करण्याची शक्यता आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
महाट्रान्स्कोमध्ये वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
इतके शुल्क भरावे लागेल?
या नोकरीसाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गातील ६०० रुपये शुल्क भरावे लागेल. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी विविध ठिकाणी भरती करण्यात आली आहे. www.mahatransco. in या वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.