⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | महाराष्ट्र | पुन्हा नंबर एक..! आयपीएल २०२१ दरम्यान वाचकांची पहिली पसंती ‘महा स्पोर्ट्स’ला

पुन्हा नंबर एक..! आयपीएल २०२१ दरम्यान वाचकांची पहिली पसंती ‘महा स्पोर्ट्स’ला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । देशातील प्रादेशिक भाषेतील पहिली स्पोर्ट्स वेबसाईट mahasports.in (महा स्पोर्ट्स डॉट इन) हिला आयपीएल २०२१ दरम्यान वाचकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. २०१६ साली सुरु झालेल्या या वेबसाईटने २०२१ च्या आयपीएलचे जबरदस्त वार्तांकन केले असून यातून वेबसाईटला मोठ्या प्रमाणावर युनिक युझर्स आणि पेजव्हुव्ज मिळाले आहेत.

देशात एप्रिल महिन्यात कोरोनाच्या हाहाकारामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. यामुळे आयपीएलचा एक टप्पा ९ एप्रिल ते ४ मे २०२१ दरम्यान भारतात झाला तर दुसरा टप्पा १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२१ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमधे होत आहे. या दोन्ही टप्प्यात महा स्पोर्ट्सच्या सर्वच कंटेंटला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

भारतात झालेल्या पहिल्या टप्प्यादरम्यान महा स्पोर्ट्सने १२०० हुन अधिक लेख आणि बातम्या प्रसिद्ध केल्या. यात ताज्या बातम्या, विश्लेषणपर लेख, ड्रीम टीम, मुलाखती यांचा समावेश होता. तसेच या दरम्यान महा स्पोर्ट्सने सुमारे १ हजारहून अधिक ग्राफिक्सही वाचकांसाठी प्रसिद्ध केले होते. तसेच ५०हुन अधिक व्हिडिओ यावेळी महा स्पोर्ट्सने सोशल माध्यमांवर प्रसिद्ध केले होते. या काळात महा स्पोर्ट्सला २७ लाख युनिक युझर्स आणि तब्बल १ कोटी ७३ लाख पेजव्हुव्ज मिळाले आहेत.

आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा सध्या युएईत सुरु असून फायनल सामन्यापूर्वी १९ सप्टेंबर २०२१ ते १३ ऑक्टोबर २०२१ दरम्यान महा स्पोर्ट्सने १,१४७ लेख आणि बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. तसेच १,२०० हुन अधिक ग्राफिक्स आणि अधिकाधिक व्हिडिओची निर्मिती या काळात केली. या दरम्यान महा स्पोर्ट्सला २४ लाख युनिक युझर्स आणि १ कोटी २६ पेजव्हुव्ज मिळाले. अद्याप आयपीएलच्या १४ व्या हंगामाचा अंतिम सामना बाकी असून यादरम्यानही मोठा वाचक महा स्पोर्ट्सला नक्की पसंती देईल, याची खात्री आहे.

डिजी रॉईस्टर ही महा स्पोर्ट्सची पॅरेंट कंपनी आहे. डिजी रॉयस्टरचे सीईओ आणि सहसंस्थापक शरद बोदगे याबद्दल बोलताना म्हणाले की, ‘आम्हाला आयपीएल दरम्यान दरवर्षी वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. मात्र, यावर्षीचे आकडे हे अतिशय सुखावणारे आहे. याचा उपयोग आम्हाला भविष्यात वाचकांना नक्की काय पाहिजे, हे शोधण्यासाठी होईल.’

महा स्पोर्ट्सची सुरुवात शरद बोदगे आणि चिन्मय रेमणे या पुणेस्थित तरुणांनी २०१६ मध्ये केली होती. स्पोर्ट्समध्ये मराठीत कंटेंट निर्माण करणारी एक अग्रगण्य वेबसाईट म्हणून सध्या ‘महा स्पोर्ट्स’कडे पाहिले जाते.

डिजी रॉईस्टरचे सीओओ आणि सहसंस्थापक चिन्मय रेमणे याबद्दल बोलताना म्हणाले की, ‘प्रत्येक व्यक्तीला इंग्रजी किंवा हिंदी भाषा समजेल असे नाही. स्पोर्ट्सबद्दल जर आपल्या मातृभाषेत वाचायला मिळाले तर वाचकांना ते नक्कीच आवडते. याचाच मोठा फायदा महा स्पोर्ट्सला होत आहे. आम्ही अशाच प्रकारची किंबहुना याहून चांगल्या कामगिरीची अपेक्षा युएईत होणाऱ्या टी२०विश्वचषकादरम्यान करत आहोत.’

महिन्याला जवळपास ३ कोटींहून अधिक पेजव्हूज महा स्पोर्ट्सला मिळतात. सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या वेबसाईटकडे स्पोर्ट्समधील मराठी भाषेतील एक खात्रीशीर बातम्या देणारी वेबसाईट म्हणून पाहिले जाते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.