जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा; वाचा निवडणुकांचे वेळापत्रक..

जानेवारी 13, 2026 4:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२६ । राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मंगळवारी जिल्हा परिषदसह पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

election

राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीविषयी माहिती दिली. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायनुसार ज्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे. अशा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार १२ जिल्हापरिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यात येणार आहे.

Advertisements

‘या’ 12 जिल्हा परिषदांसाठी होणार निवडणूक

Advertisements

कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्हा परिषदांचा समावेश आहे.

निवडणूक वेळापत्रक
नामनिर्देशन – पत्र स्वीकारणे – १६ जानेवारी २६ ते २१ जानेवारी २६
छाननी – २२ जानेवारी
उमेदवारी माघारी अंतिम मुदत – २७ जानेवारी
अंतिम उमेदवार यादी – निवडणूक चिन्ह वाटप – २७ जानेवारी दुपारी साडेतीन नंतर
मतदान – ५ फेब्रुवारी
मतमोजणी – ७ फेब्रुवारी सकाळी १० पासून

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now