---Advertisement---
हवामान

राज्यात होळीपूर्वीच उन्हाचा चटका वाढवणार ; आगामी दोन दिवस जळगावात ढगाळ वातावरण राहणार?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२५ । जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी सध्या तापमानाचा पारा ३५ अंशावर गेला असून यामुळे उन्हाचा चटका वाढला आहे. गेल्या २४ तासात राज्यातील रत्नागिरी येथे देशातील सर्वाधिक ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. तर शनिवारी जळगावचे कमाल तापमान ३४.५ अंश इतके होते. दरम्यान यातच हवामान विभागाने रविवारी आणि सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा दिलाय.

tapman 2

तर २३ ते २४ फेब्रुवारी दरम्यान जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. सद्य:स्थितीला दुपारपर्यंत पूर्वेकडून वाहणारे उष्ण वारे आणि नंतर उत्तर-पश्चिमेकडून येणारे कोरडे वाऱ्यांमुळे तापमानातील फरक वाढतो आहे. २३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान जळगाव शहरातील तापमान हे ३४ ते ३६ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शहरातील तापमानात चढ-उतार बघायला मिळत आहे. ही चढ-उतार २७ फेब्रुवारीपर्यंत होत राहणार आहे. या काळात किमान तापमान १४ ते १८ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. २३ ते २४ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील.

---Advertisement---

राज्यात कुठे पाऊस, कुठे तापमान वाढणार?
रविवार आणि सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आकाश ढगाळ होण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज आहे, असे हवामान विभागाने म्हटलंय.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भ, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भ तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत उद्यापासून गुरुवारपर्यंत काही भागांत हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत उर्वरित ठिकाणी कडाक्याचं ऊन आणि शुष्क वाऱ्यांमुळे तापमानवाढीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यांतही काही प्रमाणात हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता निर्माण होणे शक्य आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि आग्नेयेकडून राहण्याची शक्यता आहे. इतर उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्य व ईशान्येकडून राहील.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment