---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या महाराष्ट्र हवामान

महाराष्ट्रातील किमान तापमानात होणार घट, आज कुठे कसं हवामान असणार? वाचा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२५ । गेल्या काही दिवसापासून जळगावसह राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी थंडीचा जोर तर कधी अवकाळी पाऊस अशी सध्य स्थिती राज्यामध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान यातच राज्यात बहुतांश भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यामुळे थंडीचा कडाका वाढणार आहे.

tp

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गायब झालेली थंडी आता पुन्हा सुरू झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे प्रामुख्याने राज्याच्या उत्तर भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भातील पारा ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे

---Advertisement---

सध्या उत्तर भारतात दाट धुके आणि थंडीची लाट पसरली आहे. हिमालयात होत असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. काही भागात दाट धुकेही पडत आहे. सध्या विस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर पाकिस्तान भागात सक्रीय आहे. त्यामुळे उत्तरेकडील काही राज्यांमध्ये पावसासह बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात आर्द्रता वाढल्याने तापमानात बदल होत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. राज्यात बहुतांश भागात येत्या २ ते ३ दिवसांत तापमान घसरणार असून ३ ते ५ अंशांनी राज्यात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. सोमवारी राज्यातील विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानही वाढले होते. अशातच आता येत्या २४ तासांत थंडीचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---