⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | नोकरी संधी | महाराष्ट्र वन विभागात 2,417 पदांवर बंपर भरती ; 10वी/12वी/ग्रॅज्युएट्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी..

महाराष्ट्र वन विभागात 2,417 पदांवर बंपर भरती ; 10वी/12वी/ग्रॅज्युएट्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Van Vibhag Bharti 2023 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र वन विभागामार्फत विविध पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी संबंधित www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतो.

अर्ज सुरु होण्याची तारीख 10 जून 2023 असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 आहे. या भरती अंतर्गत एकूण 2417 जागा रिक्त आहे.

या पदांसाठी होणार भरती
वनरक्षक- 2138
लघुलेखक (उच्चश्रेणी) -13
लघुलेखक (निम्नश्रेणी)- 23
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- 08
वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक- 05
कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक- 15
सर्वेक्षक- 86
लेखापाल- 129

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :
वनरक्षक-
उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.

लघुलेखक (उच्चश्रेणी) : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट
इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

लघुलेखक (निम्नश्रेणी)- माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट
इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियंत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक- उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयात पदव्युत्तर पदवी
किंवा
मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारण करणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक– उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयात पदवी धारण करणे आवश्यक आहे, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

सर्वेक्षक- उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) उत्तीर्ण केलेली असावी. मान्यता प्राप्त संस्थेचे सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र धारण केलेले असावे, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

लेखापाल- उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

वयोमर्यादा :
वनरक्षक पदासाठी आवश्यक वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 27 वर्षे
मागास प्रवर्ग: 18 ते 32 वर्षे

इतर संवर्गातील रिक्त पदांसाठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 40 वर्षे
मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी
पदाचे नाव जाहिरात पहा
लेखापालClick here to Download
वनरक्षकClick here to Download
सर्वेक्षकClick here to Download
लघुलेखक, सांख्यिकी सहाय्यक (कनिष्ठ व वरिष्ठ), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)Click here to Download
author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.