जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून नमो शेतकरी योजनेचे २००० रुपये मिळणार आहेत. या योजनेचा हप्ता फेब्रुवारीमध्ये दिला असल्याचे समोर आले आहे.

राज्यातील ९१ लाख ९७ हजार शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. या योजनेच्या पुढील हप्त्यासाठी कृषी विभागाने वित्त विभागाकडे १ हजार ९३० कोटी रुपयांचा निधी मागितला आहे. हा निधी मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेत वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. दरम्यान,याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही नमो शेतकरी योजना सुरु केली आहे. या योजनेतदेखील शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये दिले जातात. या योजनेत प्रत्येकी २००० रुपये असे तीन हप्ते दिले जातात.

या योजनेत आता शेतकऱ्यांन नमो शेतकरी योजनेचा हप्ता पुढच्या महिन्यात मिळणार आहे.पुढच्या महिन्यात म्हणजेच ५ फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निधी मंजूर झाल्यानंतर सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.



