⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | सर्वसामान्यांचा प्रवास आणखी महागणार! एसटीचे तिकीट दर १० टक्क्यांनी वाढणार..

सर्वसामान्यांचा प्रवास आणखी महागणार! एसटीचे तिकीट दर १० टक्क्यांनी वाढणार..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव न्यूज | 16 एप्रिल 2024 | ऐन उन्हाळ्याच्या सुटीत गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी होत असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला असून, त्यास मंजुरी मिळाली तर चाकरमान्यांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे.

मुंबईसह राज्यभरातून राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासी उन्हाळी सुट्यांसाठी, देवदर्शनासाठी एसटी बसने प्रवास करत असतात. तर एसटी महामंडळाकडून महसूल वाढीसाठी हंगामी भाडेवाढ केली जाते. याच भाडेवाढीनुसार, उन्हाळी हंगामातील भाडेवाढीसाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

१५ एप्रिल ते १५ जून दरम्यान ही भाडेवाढ असणार असली तरी सध्याच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता परिवहन प्राधिकरणाने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठविण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.